Kabbadi Player Death : कबड्डी खेळाडूचा खेळादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तामिळनाडूच्या पाणरुती शहराजवळील मनादिकुप्पम गावात कबड्डी सामन्यादरम्यान एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूचे कारणही असे होते, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. कबड्डीपटू विमलराज हा सेलम जिल्ह्यातील एका खाजगी महाविद्यालयात शिकत होता, त्याचे वय 22 वर्षे सांगितले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यादरम्यान कबड्डीपटूचा मृत्यू


मनादिकुप्पम गावात एक कबड्डी सामना खेळला जात होता, ज्यामध्ये हा खेळाडू विरोधी संघाच्या कोर्टवर पोहोचला तेव्हा असे काही घडले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कबड्डीपटू विमलराज जेव्हा विरोधी संघाच्या कोर्टवर जातो तेव्हा विरोधी संघातील खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.


यादरम्यान विरोधी खेळाडूंनी विमलला घेरले आणि त्याला खाली पाडले. एका खेळाडूचा पाय विमलच्या छातीवर गेला, पण त्याने त्याचे 2 गुण घेतले. मात्र, त्यानंतर विमल उठू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, याचदरम्यान विमलराज याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. सर्व खेळाडूंनी विमलराजला उचलण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर विमलराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.



रुग्णालयात डॉक्टरांनी विमलराज याला मृत घोषित केले. विमलराजच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या आहे की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.


हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. विमलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे वडील विमलच्या मृतदेहासोबत त्याची विजयाची ट्रॉफी देखील दफन करताना दिसत आहेत.