इंदोर: आई-वडिलांसोबत झोपलेल्या अवघ्या चार महन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या व त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने केवळ २३ दिवसांत निर्णय दिला.  न्यायाधिशांनी ७ दिवस सात-सात तास प्रकरणाचा अभ्यास केला. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या. २१ व्या दिवशी सुनावनी पूर्ण केली आणि २३व्या दिवशी थेट निकालच दिला. विशेष असे की, पॉक्सो कायद्याची नव्याने निर्मिती करण्यात आल्यावर या कायद्यान्वये शिक्षा देण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे.


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना २० एप्रिलला घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत झोपली होती. दरम्यान, नराधम नवीन उर्फ अजय गडगे पीडितेला झोपेत उचलून श्रीनाथ पॅलेस बिल्डिंगच्या बेसमेंटला नेले. तिथे त्याने तिच्यावर १५ मिनिटांपर्यंत अत्याचार केले. त्यानंतर त्याने पीडितेला बिल्डिगच्या छतावर नेऊन तेथून खाली जमीनीवर फेकून दिले. दुर्दैव असेकी, गुन्हेगार हा पीडितेचा काका (मावशीचा पती) आहे आणि तो तिच्या आईवडिलांसोबतच राहतो. 


२३ दिवसांत आला निर्णय


दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून ७ दिवसांत आरोपपत्र न्यायायलासमोर सादर केले. न्यायालयात ७ दिवस खटला चालला. ज्यात २९ साक्षिदार तपासण्यात आले. ७ दिवसांमध्ये डिएनए टेस्ट रिपोर्टही आला. सर्व साक्षी पुरावे तपासल्यावर न्यायालयाने आरोपीला शनिवारी (१२ मे) फाशीची शिक्षा सुनावली.