डेहराडून : उत्तराखंडच्या पौडी-गढवाल जिल्ह्यात नैनीडांडाजवळ बस अपघात झाला. या दुर्घटनेत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, अनेकजण जखमी असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बसचं नियंत्रण सुटल्याने बस ६० फूट खोल दरीत कोसळल्याचं प्राथमिक वृत्त आहे. धौन गावाहून रामनगरला निघाली होती. सकाळी पिपलीधौन मोटर मार्गावर ग्वीन गावाजवळ ही घटना घडली. या भागात एका गावात जागरण कार्यक्रम होता. तो आटोपून लोकं या बसमधून परतत होती.  



तसेच सुट्ट्यांमध्ये गावी आलेले काही जण दिल्लीला जाण्यासाठी या बसमध्ये होते. दिल्लीसाठी रामनगरहून दुसरी बस पकडण्यासाठी हे लोक निघाले होते. दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.