इंदोर : देशातील अनेक शहरांचे नाव बदलल्यानंतर इंदोर शहराचे देखील नाव बदलले जावे, यावरून वाद सुरु झाले. नगर निगम परिषदेच्या संमेलनात असा प्रस्ताव करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की, मध्यप्रदेशची आर्थिक राजधानीचे नाव बदलून 'इंदूर' असे करण्यात यावे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर निगमचे सभापती अजय सिंह नरूका यांनी सांगितले की, वार्ड क्रमांक ७० चे भाजपचे नगरसेवक सुधीर देड़गे यांनी काही ऐतिहासिक तथ्यांच्या आधार देत बैठकीत इंदोरचे नाव बदलण्याची मागणी केली. 


ही मागणी करताना यासाठी काही काही ऐतिहासिक पुरावे देऊ, असेही देड़गेनी सांगितले. यानंतर विचारविनिमय करून प्रस्तावावर योग्य पाऊल उचलण्यात येईल. 


देड़गे यांनी सांगितले की, "प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिरामुळे या शहराचे नाव इंदुर ठेवण्यात आले होते. मात्र इंग्रजांच्या चुकीच्या उच्चारामुळे या शहराचे नाव इंदोर पडले. कालातंराने ते ही बदलून इंदौर झाले. इंदौर ही होळकरांची राजधानी होती आणि त्याकाळच्या अनेक ऐतिहासिक दस्तावेजमध्ये या शहराचे नाव इंदुर असल्याचे दिसून येते."