जम्मू, पंजाबस्थित सैन्यदलाच्या तुकड्यांना `ऑरेंज अलर्ट`
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार....
मुंबई : गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनंतर जम्मू आणि पंजाब या भागांमध्ये तैनात असणाऱ्या सैन्यदल तुकड्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'पंजाब, जम्मू आणि या परिसरात असणाऱ्या सैन्यदलांना सतर्क राहण्यास सांगणयात आलं आहे. पठाणकोट आणि जम्मू येथे असणाऱ्या भारतीय वायुदलाच्या तळावरही ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे'.
बुधवारी सकाळच्या सुमारास मिळालेल्या माहितीनंतरच सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या सर्व तळांवरकही संरक्षण वाढवलं असल्याची माहिती काही अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही दिवसंपासून या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पण, दोन दिवसांपूर्वीच हा देण्याच आलेले हे 'अलर्ट' शिथिल करण्यात आले होते. पण, त्यानंतर लगेचच सुरक्षा दलांच्या तळांवर मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणला जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली ज्यानंतर आवश्यक त्या सर्व ठिकाणी हा 'ऑरेंज अलर्ट' लागू करण्यात आला.
गेल्या महिन्यातच गुप्तचर यंत्रणांकडून एक महत्त्वाचा इशारा देत सैन्यदलांना सतर्क करण्यात आलं होतं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील आठ- ते दहा दहशवाद्यांनी भारतात घुसखोरी केली आहे. शिवाय ते सुरक्षा दलांच्याच तळांवर हल्ल्याचा कट रचत असल्याचीही माहिती समोर आली होती. त्याच धर्तीवर सावधगिरी बाळगत काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.