नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी महिलांना सैन्यात घेण्यासंदर्भात मोठी घोषणा केली. लष्करी पोलीस कॉर्प्समध्ये महिलांची शिपाई पदावर भरती केली जाईल. महिलांची ही भरती वर्गीकृत पद्धतीने केली जाणार आहे. टप्याटप्याने राबविण्यात येणाऱ्या या भरती पक्रियेतून लष्करी पोलीस कॉर्प्समध्ये एकूण २० टक्के महिलांना सामावून घेण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना सैन्यात प्रवेश देण्याविषयी चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला लष्करात ३,७०० महिला लघू सेवा आयोगावर (शॉर्ट सर्व्हिस कमिशन ) कार्यरत आहेत. मात्र, भारतीय लष्कराने अजूनही पायदळ किंवा चिलखती दलात (आर्मर्ड कोअर) महिलांना स्थान दिलेले नाही. युद्धाशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभियंता, सागरी टेहाळणी विमानाचे पर्यवेक्षक आणि सामरिक ऑपरेटर यासारख्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करात समलिंगी संबंधांना मान्यता नाही; लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती



मध्यंतरी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी तुर्तास महिलांना युद्धभूमीवर पाठवणे शक्य नसल्याचे सांगितले होते. युद्धभूमीवर असल्यास महिलांच्या प्रसुती रजेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण युद्धभूमीवर असताना किमान सहा महिने तुम्ही युनिट सोडून जाऊ शकत नाही. अशावेळी महिलांना रजा नाकारली तरी मोठे वाद निर्माण होतील, असे रावत यांनी सांगितले होते.


मराठा सैनिकांपुढे शत्रू चळाचळा कापतो- लष्करप्रमुख