Recruitment 2022: केंद्र सरकारच्या या मंत्रालयात 10 वी उमेदवारांसाठी भरती, पगार 81000 रुपये!
अर्जाची प्रक्रिया 29 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून तुम्ही 16 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकता.
Defence Ministry Steno Recruitment 2022: सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांतर्गत स्टेनो आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांवर भरती केली जाईल. या पदांसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mod.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया 29 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही 16 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकता.
भरती मोहिमेअंतर्गत, मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनो II (MTS आणि स्टेनो) ची पदे भरली जाणार आहेत. या जाहिरातीनुसार एकूण 40 पदांची भरती होणार आहे. यासाठी 18,000 रुपये ते 81,100 रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे. भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना बंगळुरू आणि कोची येथे काम करण्याची संधी मिळेल.
संरक्षण मंत्रालयामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनो II (MTS आणि स्टेनो) साठी भरती केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत? जाणून घ्या
1. स्टेनो II साठी 1 जागा रिक्त आहे.
2. मल्टी टास्किंग स्टाफ (मेसेंजर) साठी 4 जागा रिक्त आहेत.
3. मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस) साठी 1 जागा रिक्त आहे.
4. मल्टी टास्किंग स्टाफ (सफाईवाला) साठी 1 जागा रिक्त आहे.
या पदांसाठी किती वेतन दिले जाईल?
1. स्टेनो II साठी, मासिक वेतन 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपये असेल.
2. मल्टी टास्किंग स्टाफ (मेसेंजर) मासिक वेतन 18 हजार ते 56 हजार 900 रुपये असेल.
3. मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस) मासिक वेतन 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये असेल.
4. मल्टी टास्किंग स्टाफ (सफाईवाला) यांना 18 हजार ते 56 हजार 900 रुपये मासिक वेतन असेल.