नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील मानसरोवर पार्क येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.


जिंदाल ऑइल मिलच्या परिसरात बांधण्यात आलेल्या एका खोलीतून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मालमत्तेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी सकाळी पोलिसांना आलेल्या फोनवर ही माहिती मिळाली.  माहिती मिळताच ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु झाला.