मुंबई : भिकाऱ्यांच्या पुनरवसनासनासाठी दिल्ली सरकारने योजना आणल्या आहेत. दिल्लीच्या समाज कल्याण विभागाने गरिबीत राहणाऱ्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत भिकाऱ्यांना स्वावलंबी बनविण्यात येणार आहे. शिलाई, हस्तशल्प यांसारखे अनेक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहेत. या योजनेची कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. लवकरच कॅबिनेट समोर ही योजना आणणार असल्याचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून या कार्यक्रमासाठी नामांकन करण्यांना दरदिवशी २५० रुपये देणार असल्याचे मंत्री गौतम यांनी सांगितले.


ओळखपत्र मिळणार 


दिल्ली सरकारच्या घरांमध्ये भिकारी गेली अनेक वर्षे राहत आहेत.  जीवन बदलण्याचा विचार त्यांना देण्यात येणार आहे.  प्रशिक्षणादरम्यान भिकाऱ्यांना ओळख पत्र दिलं जाणार आहे. इतर भिकारी या प्रशिक्षणासाठी प्रेरित होतील अशी सरकारला आशा आहे.