Delhi Cab Driver Speaks In Sanskrit: भारत विविधतेने नटलेला देश आहे. विविध संस्कृती आणि भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. राज्य बदललं की भाषा आणि संस्कृती बदलते. परदेशी पर्यटकांना कायमच भारताबाबत आकर्षण राहिलं आहे. तसं पाहिलं तर भारतात संस्कृत ही भाषा बोलणारे खूप कमी लोकं आहे. स्तोत्र आणि मंत्रोच्चार सोडलं तर सहसा कोणी ही भाषा बोलत नाही. मात्र दिल्लीचा एका ड्रायव्हरची संस्कृत भाषा ऐकून तुम्हीही आवाक् व्हाल. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अस्खलित संस्कृत भाषा बोलताना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, कॅब ड्रायव्हरचं नाव अशोक असून तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील राहणारा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ इंडिया गेट जवळील आहे. ड्रायव्हर संस्कृत भाषेत सांगत आहे त्याचं नाव अशोक आहे आणि उत्तर प्रदेशातील गोंडा येथे राहणारा आहे. संपूर्ण कुटुंब तिथेच राहतं. 



कबूतर जा..जा..! प्लेन टेक ऑफवेळी विंगवरच बसून होतं, शेवटी झालं असं की...


"मम नाम अशोकम्.... " अशा अस्खलित संस्कृतमध्ये गाडीतील प्रवाशासोबत संवाद साधत आहे. प्रवासी संस्कृतमध्ये प्रश्न विचारतो आणि तो त्याला तशीच उत्तरं देतो. हा व्हिडीओ 10 नोव्हेंबर 2022 ला पोस्ट करण्यात आला आहे. 56 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत  लाखो लोकांनी पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. एका युजर्सनं लिहिलं आहे की, "हा व्हिडीओ पाहून मला लाज वाटत आहे. त्याचं संस्कृत ऐकून बरं वाटलं."