कबूतर जा..जा..! प्लेन टेक ऑफवेळी विंगवरच बसून होतं, शेवटी झालं असं की...

सोशल मीडियावर अजब-गजब व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही व्हिडीओ पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. दिवसाला हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड होत असतात. मात्र त्यापैकी काही व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Updated: Nov 10, 2022, 05:29 PM IST
कबूतर जा..जा..! प्लेन टेक ऑफवेळी विंगवरच बसून होतं, शेवटी झालं असं की... title=

Pigeon Slipping On Plane Wing Viral Video: सोशल मीडियावर अजब-गजब व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही व्हिडीओ पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. दिवसाला हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड होत असतात. मात्र त्यापैकी काही व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक कबूतर विमानाच्या पंखावर बसलेलं दिसत आहे. खरं विमान सुरु झाल्यानंतर कबूतर (Pigeon Viral Video) उडून जाईल असं सर्वांना वाटलं होतं. पण झालं भलतंच कबुतराने आपला हट्ट काही सोडला नाही आणि शेवटपर्यंत पंखावर बसून राहिलं. जेव्हा विमान टेक ऑफ करतं तेव्हा त्याला चांगलीच अद्दल घडते. पंखावरून घसरून खाली पडतं. ही संपूर्ण घटना प्लेनमध्ये बसलेल्या प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. 

19 सेकंदाचा हा व्हिडीओ ViralHog नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, कबूर विमानाच्या पंखावर मस्त तग धरून आहे. वेगासोबत आपली पकड मजबूत करताना दिसत आहे. त्यानंतर वेग वाढतो आणि कबूतर आपली दिशा बदलतं. पण वेग इतका वाढतो की कबूतर घसरून जातं. मात्र त्यानंतर काय झालं हे कॅमेऱ्यात चित्रित झालेलं नाही. यावरून कबूतर पडलं असावं असा अंदाज बांधला जात आहे. 

यापूर्वीही कबूतर विमानात घुसल्याची प्रकार समोर आला होता. विमान अहमदाबादहून जयपूरसाठी उड्डाण घेणार होते. कबूतरामुळे विमानात असल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे विमान प्रशासनाने विमान थांबवून कबूतराला बाहेर काढलं.