Kejriwal Questions BJP Talks About PM Modi Retirment: दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणासंदर्भातील मनी लॉण्ड्रींगच्या आरोपाअंतर्गत अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. काल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज केजरीवाल कनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी पोहोचले. त्यांनी हनुमानासमोर माथा टेकवत पूजा केली. त्यानंतर ते जवळच्या शनी मंदिरात आणि नवग्रह मंदिरातही गेले. यानंतर आम आदमी पार्टीच्या मुख्य कार्यालयात केजरीवाल यांनी समर्थकांना संबोधित केले. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. केजरीवाल काय म्हणाले ते पाहूयात...


मोदींना भेटतात ते आम्हालाही भेटतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"50 दिवसांनंतर तुम्हा सगळ्यांमध्ये आल्यानंतर मला बरं वाटत आहे. आपण आज हनुमानाचा आशिर्वाद घेतला आहे. त्यानंतर शिवमंदिर आणि शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. बजरंगाची आपल्या पक्षावर फार कृपा आहे. त्यामुळेच मी आज तुमच्यामध्ये आहे. निवडणुकीदरम्यान मला तुम्हाला भेटता येईल की नाही याबद्दल कोणालाच शाश्वती नव्हती. आपल्या पक्षाला चिरडून टाकण्यात पंतप्रधानांनी कोणतीही कसर सोडली नाही. एका वर्षात आपल्या पक्षाच्या चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. जे लोक मोदींना भेटतात ते आम्हाला सारं काही सांगतात," असं सूचक विधान केजरीवाल यांनी केलं.


नक्की वाचा >> 'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'


मोदी निवृत्त होणार, योगींना बाजूला करणार अन्...


पंतप्रधान मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत. 2014 मघ्ये मोदींनी नियम बनवाला आहे की भाजपामध्ये जो कोणी 75 वर्षांहून अधिक वयाचा असेल तो नेता निवृत्त होईल. सर्वात आधी लालकृष्ण आडवाणींना निवृत्त करण्यात आलं. त्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा यांना निवृत्त करण्यात आलं. आता पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी मोदीजी निवृत्त होतील. मी भाजपाला विचारु इच्छितो की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यास पहिल्या दोन महिन्यांमध्ये योगींना बाजूला केलं जाईल. त्यानंतर मोदीजी त्यांच्या सर्वात खास सहकाऱ्याला म्हणजेच अमित शाहांना पंतप्रधान बनवतील," असं केजरीवाल म्हणाले. "मोदीजी स्वत:साठी नाही तर अमित शाहांसाठी मतं मागत आहेत. त्यांनीच त्यांना पदाची लालसा नसल्याचं म्हटलं आहे," असंही केजरीवाल म्हणाले. 


नक्की वाचा >> 'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..'


मी देश पिंजून काढणार


"मी इथे 140 कोटी भारतीयांकडे भीक मागायला आलो आहे की या देशाला हुकूमशाहीपासून वाचवा. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला 21 दिवसांचा वेळ दिला आहे. एका दिवसात 24 तास असतात. मी ही हुकूमशाही रोखण्यासाठी या 21 दिवसांमध्ये संपूर्ण देश पालथा घालेन. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब या देशासाठी देण्यास मी तयार आहे," असंही केजरीवाल म्हणाले.