नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानावरुन सध्या दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या सजावटीसाठी (Home Renovation) तब्बल 44 कोटो 78 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एका चॅनेलने केलेल्या ऑपरेशन 'शीश महल'अंतर्गत (Operation Sheesh Mahal) याचा खुलासा करण्यात आला आहे. यानंतर भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल
भाजप नेते रामवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री बनण्याच्या आधी केजरीवाल आपण दोन रुमच्या घरात राहणार, सुरक्षा व्यवस्था नसणार आणि अलिशान गाड्या वापरणार नाही असं सांगितलं होतं. पण त्याच केजरीवालांना मुख्यमंत्री झाल्यावर निवासस्थानावर सजावटीसाठी तब्बल 45 कोटींचा खर्च केला आहे. सरकारी निवासस्थानाला अलिशान महलाचं रुप देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आज घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मागे 28 कारचा ताफा असतो. पंजाब पोलीसही त्यांच्या सुरक्षेत तैनात असतात. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याच कारची किंमत 50 लाखाहून अधिक आहे. 


सजावटीवर कोट्यवधींचा खर्च
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानात 8-8 लाख रुपयांचा एक-एक पडदा लावण्यात आला आहे. पडद्यांवर 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले आहेत. सरकारी निवासस्थानात जे मार्बल लावण्यात आले आहेत, ते व्हिएतनाममधून मागवण्यात आले आहेच. त्यांची किंमत जवळपास सव्वाकोटी रुपये आहे. या मार्बलची फिटिंग वेगळ्याप्रकारे केली जाते. 


आरोपांवर आपची प्रतिक्रिया
भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आपचे प्रवक्ता राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल राहतात ते निवावस्थानाचं बांधकाम 1942 चं आहे. म्हणजे जवळपास 80 वर्ष जुनं आहे. त्या घरात ठिकठिकाणी पाणी गळतीची समस्या होती. पीडब्ल्यूडी विभागाने त्यांचं ऑडिट केलं होतं. हा बंगला खासगी नाही तर सरकारी आहे. इतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या तुलनेत कमी खर्च करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्या निवासस्थानावर केला चूना लावण्यात आल्याचं 20 कोटींचं बील लावण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची किंमत जवळपास 500 किंमत आहे, असं राघव चड्ढा यांनी म्हटलंय.