वासनेने बरबटलेल्या 5 नराधमांनी गे कपलला बनवले शिकार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत..
Rape on Gay Couple: गे कपल रामलीला पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परतत असताना दिल्लीत राहणाऱ्या तरुणाला त्याचा जुना मित्र भेटला, जो या घटनेतील मुख्य आरोपी
Rape on Gay Couple: सेम सेक्स मॅरेजला कायदेशीर मान्यता द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. यानंतर एलजीबीटी समुदायाच्या हक्कांबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात समुदायाला खूप हिनतेची वागणूक मिळते, हे पुन्हा समोर आले आहे. एलजीबीटी समुदायाच्या दोन बांगलादेशी तरुणांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. वासनेने बरबटलेल्या पाच मुलांनी बांगलादेशी नागरिकांना उद्यानात नेले आणि त्यांच्यासोबत गैरकृत्य केले. दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तीन आरोपींना अटक केली. देवाशिष वर्मा (20), सुरजीत (21) आणि आर्यन (20) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व शकरपूर परिसरातील रहिवासी आहेत. समोर आलेल्या वृत्तानुसार, दोन्ही बांगलादेशी तरुण एक गे कपल आहेत. त्यापैकी एक दिल्लीत राहून शिकतो. तर दुसरा बांगलादेशातून त्याला दिल्लीला भेट देण्यासाठी आला होता. दोघांची भेट एका गे डेटिंग अॅपवर झाली होती.
आरोपींमध्ये बांगलादेशी तरुणाचा मित्र
मंगळवारी दोघेही रामलीला पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परतत असताना दिल्लीत राहणाऱ्या तरुणाला त्याचा जुना मित्र भेटला, जो या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो समलिंगी समुदायाशी संबंधित आहे. दोन्ही बांगलादेशी तरुण हे समलिंगी जोडपे असल्याचे आरोपीला समजले होते. या कारणाने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा हट्ट त्याने सुरू केला. आपली वासना शमवण्यासाठी आरोपीने आपल्या आणखी चार मित्रांनाही सोबत घेतले.
बांगलादेशी समलिंगी जोडप्याने याला विरोध केला. पण आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यांना उद्यानात नेऊन त्यांच्यावर अमानु अत्याचार केले. यानंतर बांगलादेशी तरुणाने आरोपी तरुणांविरुद्ध शकरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दाखल केली.
तपासले 50 सीसीटीव्ही फुटेज
यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपींना शोधण्याची मोहिम सुरु केली. मुलांचा शोध घेण्यासाठी 20 पोलिसांची टीम तयार केली आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज तपासले. दरम्यान पोलिसांनी एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांची चौकशी केली. यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.