Delhi Road Rage Case: काही दिवसांपूर्वी कंझावालातील अपघातामुळे (kanjhawala case) फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. ही घटनेतून दिल्ली बाहेर येत नाही, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना (Delhi Crime) समोर आली आहे. कंझावाला हिट अँड रन केसमध्ये (hit and run case) एका तरूणीचा जीव गेला होता. अशातच आता हॉर्न वाजवण्याच्या कारणावरुन दोन गटामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर जो काही प्रकार घडला, त्यावरून दिल्लीकरांना नेमकं झालंय काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. (delhi crime man dragged on car bonnet by half km in rajouri garden viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की... राजौरी गार्डन परिसरात (rajouri garden) हॉर्न वाजवण्याच्या कारणावरुन दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळ झाली, त्यानंतर भांडणात कारचालकाने रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरुन (Man Dragged on car bonnet) जवळपास अर्धा किलोमीटीरपर्यंत फरपटत नेलं. भर दिवसा ही घटना घडल्याचं पहायला मिळतंय. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) देखील समोर आलाय.


आणखी वाचा - Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना, विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले


पोलिसांनी कारच्या नंबर प्लेटवरून (Car No Plate) आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपीविरोधात आयपीसी (IPC) कलम 289, 323, 341, 308 अन्वये गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. 12 जानेवारी रोजी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.


पाहा Video - 



दरम्यान, बोनटवर फरफटत नेण्यात येत असताना आजूबाजूच्या लोकांना तरुणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर कोसळल्यानं पिडीत व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर सरकारी रूग्णालयात (Government hospital) उपचार केले गेले. त्यानंतर पोलिसांनी पिडित व्यक्तीकडून माहिती घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे.