Women Attacks As Man Asks Address: आपल्यापैकी अनेकांनी बऱ्याचदा एखाद्या ठिकाणाचा पत्ता अनोखळी व्यक्तींना विचारला असेल किंवा असा पत्ता विचारणाऱ्यांना मदत केली असेल. मात्र पत्ता विचारला म्हणून अनोखळी व्यक्तीने हल्ला केल्याची विचित्र घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. येथील एका महिलेने एका डिलेव्हरी बॉयवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला डिलेव्हरी बॉयने पश्चिम दिल्लीमधील द्वारका परिसरामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी पत्ता विचारला होता. त्याचवेळी या महिलेनं हल्ला केला.


सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनाक्रम कैद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा हल्ला शुक्रवारी नवी दिल्लीमधील द्वारका येथील सेक्टर 23 मध्ये घडलं. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. डिलेव्हरी बॉय आणि या महिलेमध्ये काही सेकंदासाठी झालेला संवादही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने 3 ते 4 वेळा वार केला. 


नक्की घडलं काय?


सीसीटीव्ही फुटेजमध्ये डिलेव्हरी बॉय त्याच्या बाजूने जाणाऱ्या या महिलेला पत्ता विचारला. या डिलेव्हरी बॉयने पत्ता विचारताच ही महिला मागे फिरली आणि तिने या मुलाच्या मानेवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर या महिलेने डिलेव्हरी बॉयच्या बाईकची चावी काढली आणि शेजारच्या झुडपांमध्ये फेकून दिली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेला डिलेव्हरी बॉय बाईकवरुन खाली उतरला. त्यानंतर या महिलेने त्याला जमीनीवर पाडलं. हा तरुण स्वत:ला सावरत असताना या महिलेने हातातील चाकूने या डिलेव्हरी बॉयच्या स्कुटीच्या चाकांवर वार केले. त्यानंतर या महिलेने आजूबाजूच्या लोकांना हाताने इशारे केले. हातात चाकू आणि एक पाय स्कुटीवर ठेवून ही महिला लोकांकडे पाहत हातवारे करत होती.


महिला पोलिसाचे केस खेचले


बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली असता ही महिला त्यांना चाकूचा धाक दाखवून घाबरवत होती, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या महिलेच्या हातून चाकू खेचून घेण्यात आल्यानंतर तिने हातात काठी घेतली आणि ती पोलिसांच्या गाडीसहीत इतर गाड्यांची तोडफोड करु लागली. महिला पोलीस कर्मचारी या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेली असता तिने या महिला कर्मचाऱ्याचे केस पकडले. मात्र त्यानंतर पोलिसी हिसका दाखवत तिला ताब्यात घेण्यात आलं.


या महिलेला वाद घालायची सवय


तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, ही महिला 42 वर्षांची आहे. ती डीडीए येथील फ्लॅटमध्ये एकटीच राहते. ही महिला भांडखोर असून ती अनेकदा शेजाऱ्यांबरोबर वाद घालत असल्याची माहिती समोर आली. या महिलेची तक्रार करुनही तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली नाही असंही तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. डिलेव्हरी बॉयचं नाव गोलू असं असून त्याला या हल्ल्यात अनेक जखमी झाल्या आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपण सामानाची डिलेव्हरी करण्यासाठी आलो होतो आणि पत्ता विचारला. त्यानंतर तिने शिव्या देण्यास सुरुवात केली असं गोलूने पोलिसांना सांगितलं. या महिलेने विटेने माझ्या गाडीची तोडफोड केल्याचंही गोलू म्हणाला. या प्रकरणामध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.