अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आईला भेटली आणि थेट...; दिल्लीतील हादरवणाऱ्या घटनेचा Video समोर
Delhi Crime : शनिवारी झालेल्या या घटनेनंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Delhi Crime News : दिल्लीच्या (Delhi crime) भजनपुरा परिसरात शनिवारी एका महिलेला गोळी मारल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. भजनपुरा परिसरात एका 50 वर्षाच्या महिलेला गोळी मारण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी 16 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी मुलीला घेतले ताब्यात
पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पिस्तुलासह घटनेच्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे. तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोळी चालवणाऱ्या मुलीकडे चौकशी सुरु केली आहे. तपासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलेवर गोळी चालवली तिच्याच मुलाने अत्याचार केल्याचे मुलीने म्हटलं आहे.
दुकानावर येताच पिस्तुल काढली आणि...
उत्तर घोंडा येथील सुभाष परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. खुर्शीदा असे जखमी महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत खुर्शीदा किराणा दुकान चालवतात होती. शनिवारी 16-17 वर्षांची एक मुलगी माझ्या दुकानात आली आणि तिने माझ्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या, असे खुर्शीदा यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी दुकानात उभी असल्याची दिसते. त्यानंतर ती काही तरी वस्तू काढली आणि गोळीबार केला. यानंतर तिथल्या एका व्यक्तीने या मुलीला पकडले. मुलीच्या हातात पिस्तुल दिसत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या मुलीने खुर्शीदा नावाच्या महिलेच्या मुलावर 2021मध्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तुल जप्त केले आहे.