नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2020) मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये काँग्रेस पक्षाचे पानिपत होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दिल्लीत काँग्रेसची पाटी कोरी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी EVM यंत्राला जबाबदार धरले आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही EVM यंत्रात फेरफारापासून सुरक्षित असलेली (Tamper Proof) चीप नाही. जगातील प्रगत देश EVM यंत्रांचा वापर का करत नाहीत, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. निकालांचे प्रारंभिक कल पाहता आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता येणार नाही, असे चित्र आहे. 



दिल्लीतील मुस्लीम बहुल मतदारसंघात कोण आघाडीवर?


वरकरणी हे निकाल 'आप'साठी फलदायी दिसत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपसाठी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 'आप'ला ५१.७७ तर भाजपला ४१.०२ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 'आप'च्या मतांचे प्रमाण २.८२ टक्क्यांनी घटले आहे. तर या निवडणुकीत भाजप हारणार असे चित्र असले तरी भाजपच्या मतांमध्ये तब्बल ८.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


'या' 5 हाय प्रोफाइल जागांकडे संपूर्ण देशाचं लक्ष


तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची कामगिरी मात्र निराशाजनकच आहे. २०१५ मध्ये काँग्रेसला ९.७ टक्के मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हा आकडा ४.०१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेसची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे.