दिल्ली : टोळला घालवण्यासाठी ढोल, फटाखे, DJ वाजवण्याचा सल्ला, अनेक परिसरात हाय अलर्ट
परिस्थिती सांभाळण्यासाठी दिली माहिती
नवी दिल्ली : दिल्लीत टोळधाडीमुळे सरकारने नवीन घोषण जाहीर केली आहे. सरकारने दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केलं आहे. या संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकास सचिव, डिविजनल कमिश्नर, डायरेक्टर एग्रीकल्चर, डीएम साऊथ दिल्ली, डीएम वेस्ट दिल्लीत उपस्थित होते.
दिल्ली सरकारने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे की, टोळधाडीला परतवून लावण्यासाठी मोठमोठ्या आवाजाचा, डीजेचा वापर करण्यास सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर फटाखे लावून त्यांना घालवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले आहेत. तसेच कडूनिंबाची पानं पेटवण्याची देखील माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आता टोळधाडीची जी तुकडी आहे. ती खूप छोटी तुकडी आहे. दिल्ली सरकार संपूर्ण परिस्थितीची देखरेख करत आहेत. साऊथ दिल्ली आणि दिल्लीच्या इतर भागात अलर्ट जाहीर करण्यात आल आहे.
हवेचा स्त्रोत पाहता दक्षिणेकडे वारा वाहत आहे. जर हवेत काही बदल होत असेल तर त्याकडे लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे दिल्लीत टोळधाड येईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीकडे लक्ष देऊन राहणं गरजेचं आहे.