Delhi Kanjhwala case : `त्या` रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा
Delhi Crime : दिल्लीतील कंझावला प्रकरणात अंजलीची मैत्री निधीने त्या रात्री नेमकं काय घडल? याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Delhi Girl Accident : दिल्लीतील कंझावला प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. (hit and run Anjali nidhi). याघटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मृत अंजलीसोबत तिची मैत्री निधी देखील तिच्या सोबत होती. या घटनेसंदर्भात तिच्या मैत्रिणीने पोलिसांना जबाब दिला असून या अनेक धक्कादायक बाबी आणखी समोर येत आहे. त्या रात्री अंजलीसोबत काय घडलं याचा खुलासा अंजली मैत्री निधीने केला आहे.
31 डिसेंबरच्या रात्री काय घडलं?
31 डिसेंबरच्या रात्री आम्ही नवीन वर्ष एकत्र साजरे करण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरला तिने मला फोन केला आणि मला घेण्यासाठी सुलतानपुरीत आली. त्यानंतर आम्ही रोहिणीला गेलो. ती मला तिच्या घरी घेऊन गेली, मग आम्ही हॉटेलवर गेलो. त्यानंतर मी आणि अंजली पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमधून निघालो होतो. त्यावेळेस अंजली चिडलेली होती. जर तिचा प्रियकर तिला भेटला नाही तर ती मरेल, अस ती म्हणत होती. मी तिला स्कूटी थांबायला सांगितली, पण तिनं थांबवली नाही. त्यानंतर काही क्षणातच स्कूटीला एका गाडीने धडक दिली. या अपघातात अंजली कारखाली अडकली, ती वेदनेने खूप व्हिवळत होती, पण गाडीतील लोकांनी तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि जाणीवपूर्वक गाडी पळवली. गाडी थांबली असती तर अंजलीला वाचली असती, अशी माहिती अंजलीची मैत्री निधीने पोलिसांना दिली आहे.
वाचा: 'ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतायत,' चित्रा वाघ वादावर उर्फीची पोस्ट Viral
तसेच य घटनेच्या रात्री तिची मैत्रीण निधी अंजलीसोबत तिच्या स्कूटीवर गेली होती. मात्र तिला या अपघातात कोणतीही जखम झाली नाही. कारण अंजलीची मैत्रीण निधी खूप घाबरली होती, त्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा ती अंजलीला सोडून पळून गेली. त्यानंतर हा घटनाक्रम तीने तिच्या कुटूंबाला सांगितला.
मुलांना माहित होत ती गाडीखाली अडकली
निधीने सांगितले की, कार स्कूटीला धडकल्यानंतर मी एका बाजूला पडले, माझी मैत्रिण गाडीखाली अडकली. पण गाडी चालवणाऱ्याना मुलांना माहिती होतं की गाडीखाली मुलगी अडकली आहे, ती खालून ओरडत होती, असंही निधीने सांगितले. तरीही त्या मुलांनी गाडी थांबवली नाही.