नवी दिल्ली: दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता अधिकच टोकदार झाला आहे. गेले सहा दिवस बैजल यांच्या कार्यालयात आंदोलनासाठी बसलेल्या केजरीवाल यांची देशातील बिगर भाजप शासित चार राज्यातील मुख्यमंत्री भेट घेणार होते. पण, ही भेट घेण्यास अनिल बैजल यांनी नकार दिला आहे.


केजरीवाल यांना भेटण्यास राज्यापालांचा नकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांची भेट घेण्यास इच्छूक असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा समावेश आहे. या चारही मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना भेटण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी त्यांना नाकरण्यात आली आहे.





चार मुख्यमंत्री काढणार मोर्चा


दरम्यान, आंदोलनास बसलेल्या केजरीवला यांनी दिल्लीतल्या आयएएस अधिकाऱ्यांनी संप मागे घ्यावा ही प्रमुख मागणी केली आहे. दरम्यान, राज्यपालांनी परवानगी नाकारली असली तरी, हे चार मुख्यमंत्री निवासस्थापासून राज्यपालांच्या निवासस्थानी मार्च करणार असल्याची माहिती आम आदमी पक्षातील सूत्रांनी दिली आहे.