CCTV Murder Video :  दिल्ली पोलिसांचा धाक संपला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण भर बाजारपेठे एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थीची हत्या करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे. मयंक पवार असं या मृत तरुणाचे नाव होते. दिल्लीतील डीडीए मार्केटमधील ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता  एक तरुण रस्त्यावर धावत आहे आणि 4 ते 5 जण त्याचा पाठलाग करत आहे. पुढे व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, या चारपाच जणांनी त्या तरुणाला गाठलं आणि भर बाजारात त्याच्यावर चाकूने प्राणघात हल्ला करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये अनेक लोक असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्या तरुणाच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही. 


मयंकवर हल्ला करुन आरोपी फरार झाले. त्यानंतर मयंकला त्याच्या मित्राने लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू झाला. 


नेमकं काय आहे प्रकरण?


मयंक त्याचा मित्रासोबत बेगमपूरमध्ये बसले होते. त्याठिकाणी  4-5 मुलांसोबत काही गोष्टींवरुन मयंकचा वाद झाला. नंतर या वाद विकोपाला गेला आणि दगडफेक सुरु झाली. या घटनेनंतर मयंक आणि त्याचा मित्र जीव वाचवून पळाले. मात्र त्या मुलांनी मयंकचा पाठलाग केला आणि त्याला मार्केटमध्ये गाठलं. मयंकला घेरून 4-5 जणांनी त्याचावर चाकूने हल्ला केला. 



दरम्यान आरोपींचा शोध सुरु असून त्यांना लवकर पकडण्यात येईल, अशी माहिती डीसीपी बेनिता मेरी जॅकर यांनी दिली आहे.