Delhi MCD Election 2022 Result : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार  AAP ने आतापर्यंत 130 जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापर्यंत 97 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 7 तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.


काँग्रेसचा सुपडा साफ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पार्टीने (AAP) दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (MCD Election) पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि आतापर्यंत 130 जागा जिंकल्या आहेत. एमसीडीमध्ये 250 वॉर्ड आहेत आणि बहुमताचा आकडा 126 आहे. एक्झिट पोलने दारुण पराभवाचा अंदाज वर्तवलेल्या सत्ताधारी भाजपने आतापर्यंत 99 वॉर्ड जिंकले आहेत. अवघ्या सात जागा जिंकून काँग्रेस खूपच मागे पडली होती आणि मागेच पडली. मागील निवडणुकीत 30 जागा जिंकल्या होत्या. यावेळी निराशाजनक कामगिरी केलेय. ईशान्य दिल्लीतील सीलमपूरमधून शकीला बेगम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.


Delhi MCD Election 2022 Result Update : दिल्लीत 'आप'ला पूर्ण बहुमत, भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता


सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली आणि सुरुवातीच्या ट्रेंडने भाजपने केजरीवाल यांच्या पक्षापेक्षा मोठी आघाडी घेतली होती. परंतु मतमोजणी जसजशी पुढे सरकच होती तसतसा निकाल आपच्या बाजूने फिरला. या वर्षाच्या सुरुवातीला MCD पुन्हा एकत्र झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. यापूर्वी 2017 च्या दिल्लीतील नागरी निवडणुकांमध्ये, भाजपने त्यावेळी 270 नगरपालिका वॉर्डांपैकी 181 जिंकले होते, तर AAP फक्त 48 जिंकले होते आणि काँग्रेस 30 जागा जिंकत तिसऱ्या स्थानावर होती. यावेळी काँग्रेसची कामगिरी निराशाजणक पाहायला मिळाली. (हेही वाचा : MCD Election : AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का)


मनीष सिसोदिया यांची पहिली प्रतिक्रिया


केवळ विजय नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एमसीडी निवडणुकीत आप जिंकल्यानंतर दिली आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत बहुमताचा आकडा 126 ओलांडला आहे, पक्षाचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले की हा "फक्त विजय नाही" आणि "ही एक मोठी जबाबदारी आहे". त्यांनी ट्विटरवर  राजधानीतील जनतेचे आभार मानले आहेत. दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात नकारात्मक पक्षाचा पराभव करुन, दिल्लीच्या जनतेने प्रामाणिक आणि कार्यशील अरविंद केजरीवाल जी यांना विजयी केले आहे. आमच्यासाठी हे काही नाही. फक्त एक विजय, ही एक मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.