Delhi MCD Election 2022 Result LIVE : दिल्लीत 'आप'ला पूर्ण बहुमत, भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता

दिल्ली महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला असताना सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत कलांनुसार आपची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर भाजप पिछाडीवर आहे. आपकडून जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झालेय.

Delhi MCD Election 2022 Result LIVE : दिल्लीत 'आप'ला पूर्ण बहुमत, भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता

MCD Election Results 2022 : दिल्ली महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला असताना सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत कलांनुसार आपची सत्ता आली आहे. आपला पूर्णपणे बहुमत मिळाले आहे. तर भाजप पिछाडीवर जात सत्तेतून पाय उतार होताना दिसत आहे.. आपकडून जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झालेय.

Delhi MCD Election 2022 Result LIVE : आप 36 जागा, भाजप 32 आणि कॉंग्रेसने चार जागा जिंकल्या

7 Dec 2022, 14:27 वाजता

Delhi MCD Election 2022 Result LIVE :  आम आदमी पार्टीने (AAP) दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (MCD Election) पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि आतापर्यंत 130 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापर्यंत 97 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 7 तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.

7 Dec 2022, 14:26 वाजता

Delhi MCD Election 2022 Result LIVE :  आम आदमी पक्षाने (AAP) भारतीय जनता पक्षाला (BJP) 15 वर्षांनंतर सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (MCD Election) बहुमत मिळवले. 'आप'ने आतापर्यंत 126 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला 97 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 7 तर इतर पक्षांना एक जागा मिळाली आहे.

7 Dec 2022, 13:21 वाजता

MCD Election Results Live :  दिल्लीत 'आप'चे शतक.  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत 206 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने (AAP) 110 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापर्यंत 89 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 6 आणि इतर पक्षांना एक जागा मिळाली आहे.

7 Dec 2022, 13:20 वाजता

MCD Election Results Live :  भाजपला मोठा धक्का. दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व जागा गमावल्या आहेत. त्याचवेळी दिल्ली सरकारचे मंत्री सतेंद्र जैन यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर आम आदमी पक्षाला (AAP) पराभवाचा सामना करावा लागला आहे. सत्येंद्र जैन दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहेत.

7 Dec 2022, 12:49 वाजता

Delhi MCD Election 2022 Result LIVE :   दिल्ली महानगरपालिकेसाठी (MCD Election ) मतमोजणी सुरु असून आतापर्यंत 177 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने (AAP) 97 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापर्यंत 75 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत 4 तर इतर पक्षांना एक जागा मिळाली आहे.

7 Dec 2022, 11:52 वाजता

MCD Election Results Live :  'आप'ची बाजी, भाजप पिछाडीवर । दिल्ली पालिका निवडणुकीत आतापर्यंत 94 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सुरुवातीच्या निकालांमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) भारतीय जनता पक्षाला (BJP) मागे टाकले असून 49 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला 40 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने 4 जागा काबीज केल्या आहेत, तर एक जागा अन्य उमेदवाराला गेली आहे.

7 Dec 2022, 11:50 वाजता

MCD Election Results Live :  सुलतानपुरी अ जागेवरून ट्रान्सजेंडर बॉबी किन्नर विजयी. सुलतानपुरी ए वॉर्ड 43 मधून आम आदमी पार्टीचे (AAP) ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर विजयी झाले आहेत. बॉबी किन्नर यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एकता जाटव  यांचा पराभव केला.

7 Dec 2022, 11:30 वाजता

MCD Election Results Live :  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपने आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवर आहे. ताज्या अपडेटनुसार, AAP ने 36 जागा जिंकल्या आहेत, भाजपने 32 आणि कॉंग्रेसने चार ठिकाणी विजय मिळवला आहे.

7 Dec 2022, 11:12 वाजता

MCD Election Results Live :  आतापर्यंत विजयी झालेले उमेदवार

- कमला नगरमधून भाजपच्या रेणू अग्रवाल विजयी झाल्या
 
- मोलारबंद जागेवरून आपचे हेमचंद गोयल विजयी झाले.

- आम आदमी पक्षाचा उमेदवार संगम विहार-सी आणि संगम विहार-बी मधून विजयी  

- बुध विहार एमसीडी विजेता: बुध विहारमधून आपचे अमृत जिंकले

- जनकपूर दक्षिणमधून आपच्या डिंपल आहुजा विजयी

- चौहान बांगर जागेवर काँग्रेस विजयी

- चौहान बांगर जागेवरून काँग्रेसच्या शगुफ्ता चौधरी विजयी

- संगम पार्कमधून भाजपचे सुशील विजयी झाले

- कादीपूर आणि संतनगर मतदारसंघातून 'आप'चे उमेदवार विजयी झाले.

- सिद्धार्थनगरमधून भाजपच्या सोनाली विजयी

- AAP च्या आरती यादव कापशेरामधून विजयी

- लाजपत नगरमधून भाजपचे अर्जुनपाल मारवाह विजयी

- मोहन गार्डनमधून भाजपचे श्यामकुमार विजयी झाले

- गौतमपुरीमधून भाजपचे सत्य शर्मा विजयी

- शकरपूरमधून भाजपचे रामकिशोर विजयी झाले

- मौजपूरमधून भाजप अनिल विजयी

- मुकुंदपूरमधून भाजपचे गुलाब सिंह विजयी

7 Dec 2022, 11:09 वाजता

MCD Election Results Live :  दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आतापर्यंत 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी भाजपने 5 तर 'आप'ने 4 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस आणि अपक्षांच्या खात्यात 1-1 जागा गेल्या आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला असून मोहन गार्डन जागेवर पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे.