नवी दिल्ली: दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी कमालीची वाढल्यामुळे रस्त्यावर टँकरने पाण्याचा मारा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषण पातळी कमालीची वाढली आहे. दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असून त्यात बाहेर पडणारा धूर प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. परिणामी दिल्लीतील प्रदूषण अति वाईट पातळीकडे सरकण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या सुरु आहेत. त्यासाठी पहाटेच्यावेळी रस्त्यांवर टँकरने पाण्याचा मारा केला जात आहे. 



२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणकारी फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती व हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा आदेश दिला होता.