नवी दिल्ली :  विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून भाजप (BJP) आणि आम आदमी पार्टीमधील (AAP) वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्ष अनेक वेळा एकमेकांबरोबर भिडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळानंतर आता पूर्व दिल्लीतील महापालिका सदनात भाजप आणि आपचे नगरसेवक आमनेसामने आले.  सदनातच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर वाद वाढला
भाजप आणि आपचे नगरसेवक बुधवारी पूर्व दिल्लीच्या महानगरपालिका सदन (EDMC) मध्ये जमले होते. सभागृहाच्या बैठकीत भाजप नगरसेवकांनी निषेध प्रस्ताव आणला होता. दिल्ली विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांची चेष्टा केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. सीएम केजरीवाल यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली.



भाजपा-AAP नगरसेवक भिडले
भाजप नगरसेवकांच्या या मागणीवर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला.  वाद वाढत गेला, आपचे नगरसेवक सभागृहनेत्यापर्यंत पोहोचले आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या हाणामारीत अनेक नेते जखमी झाले आहेत. काही नगरसेवकांचे कपडेही फाटले. नेत्यांनी एकमेकांवर चप्पल आणि बुटांनी हल्लाही केला