नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला एक मोठं यश हाती आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीससी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या वजीराबादमध्ये गुरूवारी सकाळी एन्काऊंटर नंतर 3 जणांना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून हत्यारं देखील पोलिसांनी हस्तगत केली. या आरोपींची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे दहशतवादी नेपाळच्या मार्गाने भारतात आल्याचं सांगितलं आहे.


या दहशतवाद्यांचा दिल्ली हादरवून टाकण्याचा इरादा होता. दहशतवाद्यांकडून हत्यारं देखील हस्तगत करण्यात आल्याने हे प्रकरण आणखी गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ISIS कडून आदेश मिळण्याची वाट हे दहशतवादी पाहत होते, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.