Pakistan Vs Sri Lanka Asia Cup: आशिया चषकावर श्रीलंकन संघानं नाव कोरलं आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंच्या झेल सोडल्याच्या व्हिडीओची चर्चा होत आहे. भानुकाला जीवदान मिळाल्यानेच पाकिस्तानचा पराभव झाल्याचं पाकिस्तानी नेटकरी सांगत आहे. या प्रकरणी नेटकरी शादाब खानवर टीकेची झोड उठवत आहे. आता दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी खेळाडूंनी सोडलेल्या झेलचा व्हिडीओ शेअर करून लोकांना रस्ता सुरक्षेसाठी अनोखा संदेश दिला आहे. दिल्ली पोलीस अनेकदा असे मजेदार व्हिडीओ शेअर करून रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करत असतं. यावेळीही कल्पकतेचा वापर करत पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan Vs Sri Lanka) यांच्यातील आशिया कपच्या (Asia Cup) अंतिम सामन्याची क्लिप शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला आणि चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी खेळाडू एकमेकांवर आदळले. परिणामी फलंदाजाला 4 धावांऐवजी 6 धावा मिळाल्या. हा व्हिडी ओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना दिल्ली पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ए भाई, जरा देख के चलो.' दिल्ली पोलिसांनी रस्त्यावरून चालताना सतर्कता का ठेवली पाहिजे यावर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडीओ वापरला होता.



दिल्ली पोलिसांनी ट्वीट केलेला व्हिडीओ प्ले कराल तेव्हा बॅकग्राउंडमध्ये 'ए भाई, जरा देख के चलो' हे ऐकायला येईल. हे गाणे 1970 मध्ये रिलीज झालेल्या राज कपूर स्टारर 'मेरा नाम जोकर' मधील आहे. श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया कप जिंकला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने एकूण 170/6 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावाच करू शकला.