मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग, `दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने नाहीत`
`दिल्ली राज्य सरकारने येथील जनतेची निराशा केली आहे. खोटी आश्वासने दिली आहेत.`
नवी दिल्ली : राज्य सरकारने येथील जनतेची निराशा केली आहे. खोटी आश्वासने दिली आहेत. साधे पाणी मिळत नाही. जे मिळत आहे ते पिण्यायोग्य आहे का, असा सवाल करत थेट जनतेशी संवाद साधला. दिल्ली सरकारने मेट्रोच्या कामात खोडा घातला आहे. अरविंद केजरीवाल सरकारने फक्त विरोधाचेच काम केले आहे, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींची मोठी सभा झाली. या सभेत मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून आले आहे. आता तुम्हाला खोटी आश्वासने मिळणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. वसाहतींचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावे लागले आहे. आम्ही सगळ्यांना घरे देत आहोत. येथे कोणत्याही धर्माचा विचार केला नाही. गरिबांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कशाला धर्माच्या नावाखाली प्रचार केला जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सवाल केला आहे.
देशात ‘विविधतेत एकता’ असल्याची घोषणा देत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. त्याला उपस्थितांना जोरदार प्रतिसाद दिला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना खूप आश्वासने देण्यात आली आहेत. यावेळी मोदीं यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सरकारवर अर्थात केजरीवाल सरकारवर जोरदार टीकाही केली. कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचे काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही. दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे, असे मोदी म्ह्णालेत.
नरेंद्र मोदी रॅली भाषण मुद्दे
- माझा पुतळा जाळा पण संपत्तीचं नुकसान नको
- नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
- समस्या रखडत ठेवणं आमच्या संस्कारात नाही
- ४० लाख नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून दिला
- अनधिकृत वसाहती नियमीत केल्या
- अरविंद केजरीवाल सरकारने फक्त विरोधाचेच काम केले आहे
- दिल्लीकरांना आता खोटी आश्वासनं मिळणार नाहीत
- विविधतेत एकता हीच भारताची ताकद