नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाला हाती आला आहे. निकालातून आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यानंतरही भाजप नेत्यांनी आपला पक्ष जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यामध्ये एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर असं म्हटलं जातंय की, भाजपने आपलं अपयश स्विकारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पोस्टर भाजपने दिल्ली कार्यालयाबाहेर लावलं आहे. या पोस्टरमध्ये अमित शाह यांचा फोटो असून चार ओळी लिहिल्या आहे. यामध्ये म्हटलंय की, विजय से हम अहंकारी नहीं होते और पराजय से हम निराश नहीं होते.... अशा पंक्ती लिहिल्या आहेत. (#DelhiAssemblyResults2020 Live Updates : अरविंद केजरीवाल हॅट्रिक करणार?) 


निकालात भाजप आपच्या मागे असला तरीही त्यांनी 2015 पेक्षा आताच्या लढाईत चांगलीच तयारी केली होती. 2015 मध्ये भाजपच्या खात्यात फक्त 3 जागा होत्या तिथे आता भाजप 14 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे. (#DelhiResults2020: दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा) 


 


भाजप या जागांवर आघाडीवर 
1-बवाना-रविंद्र कुमार
2-छतरपुर-ब्रह्म सिंह तंवर 
3-दिल्ली कैंट-मनीष सिंह 
4-घोंडा- अजय महावर
5-हरिनगर- तेजिंदर पाल सिंह बग्गा 
6-जनकपुरी-आशीष सूद 
7-जंगपुरा-इम्प्रीत सिंह बक्शी 
8-कालकाजी-धर्मवीर सिंह 
9-करावल नगर-मोहन सिंह बिष्ट 
10-कृष्णा नगर- डॉ अनिल यादव 
11-मॉडल टाऊन - कपिल मिश्रा



12-मुस्तफाबाद- जगदीश प्रधान 
13-ओखला- ब्रह्म सिंह 
14-रोहतास नगर - जितेंद्र महाजन 
15-शालीमार बाग- रेखा गुप्ता
16-त्रिनगर- तिलक रामगुप्ता 
17-तुगलकाबाद-विक्रम बिधूड़ी 
18-विश्वास नगर- ओपी शर्मा