नवी दिल्ली: अनलॉक नंतर आता पार्लर आणि स्पा मसाज सेंटर्सना सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी त्याचा उपयोग अवैध प्रकारे केला जात असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच नागपूरमधील सलूनमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. ही घटना ताजी असताना आता देशाची राजधानी दिल्लीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्पा सेंटरमधील अवैध प्रकारांवर आळा घालण्यासाठी दिल्लीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पा सेंटरमधून देहव्यापार आणि सेक्स रॅकेट होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्पा सेंटरमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तीचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच महिलांनी पुरुषांचा आणि पुरुषांनी महिलांचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं आहे. ह्या निर्णयामुळे सेक्स रॅकेटवर आळा बसेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लैंगिक शोषण आणि देहव्यापार रोखण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील स्पा आणि मसाज सेंटर चालवण्यासाठी कठोर नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये स्पा करण्यासाठी जर पुरुष स्पा सेंटरला आला तर पुरुषानेच स्पा करावा असं म्हटलं आहे तिथे महिलांना स्पा करण्यावर बंदी लावण्यात आली आहे.'


'मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, 'स्पा आणि मसाज केंद्रांमध्ये विरुद्ध सेक्सच्या व्यक्तीद्वारे मालिश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुरुषांच्या मालिशसाठी पुरुष मालिश करणाऱ्यांसाठी तर महिलांच्या मालिशसाठी महिला मालिश करणाऱ्यासाठी तरतूद करण्यात येईल.' याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी लोकांना अशा ठिकाणी कामावर ठेवण्यासाठी बंदी लावण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र याबाबत सध्या तरी कोणतेही निर्देश काढण्यात आले नाहीत.