नवी दिल्ली : नॉर्थ ईस्ट दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३४ जणांचा बळी गेलाय तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. हिंसाचारग्रस्त भाहात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय. दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आलीय. प्राथमिक तपासात हिंसाचारात नासिर आणि छेनू गँग सामील असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी इथल्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी १२ हून अधिक जणांना ओळखलंय. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दिल्लीची जबाबदारी असणाऱ्या अजित डोवाल यांनी आपल्या अहवाल गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवलाय. अजित डोवाल यांनी मौजपूर आणि घोंडाचा दौरा करून स्थानिकांशी बातचीत केलीय. तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रभावित भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. 



पीडितांशी चर्चा करून त्यांची परिस्थिती जाणून घेतली. दुसरीकडे स्थानिक परिस्थिती पाहता सीबीएसईनं आजची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केलीय. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी होणारेय. १९८४ सारखी दुसरी घटना पाहू शकत नाही अशा शब्दांत दिल्ली हायकोर्टानं खडे बोल सुनावले होते.