नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारात (Delhi Violence) अनेक लोक बेघर झाले आहेत. या  हिंसाचारात ज्यांची घरे जळालीत आहेत, त्यांना दिल्ली सरकार (Delhi  Government) २५ हजार रुपयांची तातडीची रोख मदत देणार आहे. दरम्यान, हिंसाचार थांबला असला तरी परिस्थिती तणावग्रस्त आहे. शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. हिंसाचारानंतर नवी माहिती पुढे येत आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांची मोठी चूक समोर आली आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात अनेक जण जखमी झालेत. ८७ लोकांना गोळी लागल्याचे पुढे आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी दंगलीतील २३ आणि शस्त्रास्त्र कायद्यातील ३६ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी ३६ देशी पिस्तूल, ३ पिस्तूल आणि ४८ काडतुसे जप्त केल्या आहेत. हिंसाचाराच्यावेळी अनेक लोकांच्या गाडय़ांची, घरांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर जाळण्यात आले होते. या जवानाला मदत करण्यासाठी बीएसएफने आता पुढाकार घेतला आहे.



मोहम्मद अनिस असे या जवानाचे नाव आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील खास खजुरी गली परिसरात मोहम्मदचे घर होते. हिंसक जमावाने मोहम्मद घर पेटवून दिले. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी अनीसच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्याचे संपूर्ण घर पुन्हा बांधून देणार असे आश्वासन दिले आहे.  


दंगलीमुळे आतापर्यंत ८७ जणांवर गोळी लागलेली आहे. तसेच नऊ पोलीस क्षेत्रात हा हिंसाचार उफाळल्याचे पुढे आले आहे. दयालपूर पोलीस ठाणे क्षेत्रात सर्वाधिक पोलीस लोकांचा मृत्यू झाला आहे. ठाणे करावल नगर, ठाणे भजनपुरा, ठाणे गोकलपुरी, जाफराबाद, वेलकम, न्यू उस्मानपूर, ज्योती नगर, खजुरी खास या ठिकाणी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.


दिल्लीतील हिंसाचारात पोलिसांची मोठी चूकही समोर आली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार केला. २४ फेब्रुवारी नंतर, हिंसाचार क्षेत्राचा नाकाशा तयार करण्यात आला आणि त्यानंतर योग्य तपासाची सूत्रे हललीत. दंगल क्षेत्राबद्दल चांगल्या प्रकारे माहिती असलेल्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणी पाठविण्यात आले. त्यानंतर दंगलीवर नियंत्रण आणण्यात यश आले.