UP Crime News : डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाने वकिल असलेल्या तरुणीला फसवून तिच्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार गाझियाबादमध्ये समोर आला आहे. तरुणाने स्वत:ला एमबीबीएस डॉक्टर असल्याचं सांगितल्याचा आरोप तरुणीने केला आहे. फसवण्यासाठी त्याने डॉक्टरांच्या गणवेशातील फोटो मॅट्रिमोनिअल साइटवर टाकला होता. त्याच्या गळ्यात स्टेथोस्कोपही होता. त्यामुळे आरोपी डॉक्टर असल्याचा समज सर्वांचा झाला. लग्नासाठी कुटुंबाने 15 लाख रुपये खर्च केले अन् वाजतगाजत लग्नसोहळा पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर असं उघड झालं की आरोपी तरुणाचं शिक्षण फार कमी आहे आणि तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. महिलेला हा सर्व प्रकार समजल्यावर मुलीने वन स्टॉप सेंटरकडे तक्रार केली आणि सांगितलं की, तिचे सत्य बाहेर आल्यानंतरही तिनं हृदयावर दगड ठेवला आणि हे आपले नशीब समजून विश्वासघात सहन करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचं गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली. पाणी डोक्यावरून वाढू लागल्यावर त्यांना वन स्टॉप सेंटरवर येऊन तक्रार करावी लागली.


समुपदेशक अंजना चौहान यांनी सांगितलं की, मुलीचे 2021 साली लग्न झालं होतं. तिला दोन वर्षे मारहाण आणि मारामारी सहन करावी लागली. चार समुपदेशनानंतरही कराराला वाव दिसला नाही, तेव्हा विजयनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.


मुलींनो धाडसी व्हा!


वन स्टॉप सेंटरच्या मॅनेजर प्रीती मलिक यांनी सांगितले की, येथील बहुतांश केसेस घरगुती हिंसाचाराच्या आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे अशी आहेत ज्यात महिला दीर्घकाळापर्यंत हिंसाचार शांतपणे सहन करत आहेत. अशी काही प्रकरणे आहेत ज्यात महिलांना कायदेशीर कारवाई हवी असते, पण त्यांचे पालक त्यांना साथ देत नसतील तर त्यांना माघार घ्यावी लागते. पण, हळूहळू परिस्थिती बदलत आहे. केंद्रात तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. पती-पत्नीमधील वादाचा मुद्दा असेल तर दोघांमध्ये तडजोड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो.