नवी दिल्ली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशाला नवं संसद भवन मिळण्याची शक्यता आहे. सध्याचं संसद भवन बांधकामशैलीचा उत्तम नमुना असला तरी लोकसभा, राज्यसभेच्या सर्व खासदारांना सामावून घेण्यास तोकडं आहे. संसद भवनाच्या नव्याने बांधणीसाठी सरकारने निविदा काढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नव्या इमारतीत भारताची स्वप्न, आशा, आकांक्षा, संस्कृती यांचं प्रतिबिंब असणार आहे. सध्याची इमारत एवढ्या खासदारांसाठी कमी पडतेय. तसंच इथली कुलिंग सिस्टीमही जुन्या पद्धतीची असल्याने प्रभावी नाही. त्यामुळे नवी इमारत उभारण्याचा घाट घातला जातोय. 


संसद भवनाची नव्याने बांधणी करण्याची मागणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली होती.