मुंबई : भारतातली सर्वात स्वस्त कार म्हणून नावा रुपाला आलेली रतन टाटांची ड्रीमकार नॅनो आता अखेरचा श्वास घेते आहे. गेल्या महिन्यात गुजरातच्या साणंदमध्ये फक्त एक नॅनो कार तयार झाली. छोट्या कुटुंबांना सुरक्षितपणे एकत्र प्रवास करता यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅनोच्या देशांतर्गत विक्रीलाही मोठा ब्रेक लागला आहे. गेल्या महिन्यात अख्ख्या देशात फक्त तीन नॅनो कारची विक्री झाली. गेल्या वर्षी जून महिन्यात २१७ नॅनो गाड्य़ा तयार झाल्या होत्या. यंदा हा आकडा अवघ्या एका नॅनोवर येऊन ठेपला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त गुंतवणूक केल्याशिवाय २०१९ नंतर नॅनोचं उत्पादन करणं अशक्य असल्याचं टाटा मोटर्सनं यानिमित्तानं स्पष्ट केलं आहे. पण या अतिरिक्त गुंतवणूकीविषयी काहीही निर्णय घेतला नसल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.