Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral
Desi Jugaad News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती कपड्यांना इस्त्री करण्याठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसत आहे. या माध्यमातून गेली अनेक वर्षे दुकानदार कपड्यांना इस्त्री करत आहे.
Desi Jugaad Video: घरात सिलिंडरचं महत्त्व किती आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. एखाद दिवस सिलिंडर संपला असेल तर धावपळ उडते. कारण जेवणाचा खोळंबा होऊन जातो. त्यामुळे सिलिंडर आल्यापासून किती टिकतो याचं गणित केलं जातं. पाच सहा दिवस आधीच सिलिंडरची सोय केली जाते. असं असताना या सिलिंडरचा आणखी कसा वापर केला जाऊ शकतो, हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. देसी जुगाडचा (Desi Jugaad) व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. एक व्यक्ती सिलिंडरचा वापर करून कपड्यांना इस्त्री करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, खरंच असं होऊ शकतं का? हा व्हिडीओ जुना असून पुन्हा व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?
व्हिडीओ तयार करणारा व्यक्ती कपड्यांना इस्त्री करण्यासाठी जवळच्या दुकानात गेला. तिथे गेल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. खरंच अशा पद्धतीने इस्त्री केली जाऊ शकते का? असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा त्या दुकानदाराने सांगितलं की, गेल्या 4 वर्षांपासून मी कपड्यांना अशा पद्धतीने इस्त्री करत आहे. मात्र ही पद्धत तुम्ही पहिल्यांदा पाहिल्याने आश्चर्य वाटत आहे. संबंधित व्यक्ती तात्काळ आपल्या खिशातून मोबाईल काढून देसी जुगाड आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला.
बातमीची वाचा: Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सिलिंडरला पाईप लावला आहे आणि एका रेग्युलेटरच्या माध्यमातून तापमान एडजस्ट केलं जात आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, 'वॉव, काय टॅलेंट आहे.' या व्हिडीओखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'खरं तर हा जुगाड महागात पडू शकतो.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'हे काही टॅलेंट नाही, यामुळे जीव देखील जाऊ शकतो.'