Boyfriend बरोबर Romance सुरु असतानाच मुलीची आई गच्चीवर आली अन्...; Video झाला Viral
Mom Catches Daughter Romancing With Boyfriend: घराच्या गच्चीवर मुलगी प्रियकराबरोबर असतानाच मुलीची आई तिथे आली आणि त्यानंतर काय घडलं हे या व्हिडीओत कैद झालं आहे.
Mother Caught Daughter with Boyfriend: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. अर्थात प्रेमीयुगुलांकडून हा डायलॉग अनेकदा वापरला जातो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण संपूर्ण जगाला आणि खास करुन प्रेमवीरांच्या आई-वडिलांना हे लॉजिक पटेलच असं नाही. असाच काहीसा प्रकार एका कपलबरोबर घडला आहे. या प्रेमीयुगुलाला मुलीच्या आईने घराच्या गच्चीवर रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं. यानंतर जे काही घडलं ते अगदीच अनपेक्षित होतं असं म्हणता येणार नाही.
व्हिडीओमध्ये काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील कॅप्शनमध्येच एका भारतीय आईने तिच्या मुलीला बॉयफ्रेण्डबरोबर रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेने दोघांनाही चपलेनं चोप दिला. व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगी गच्चीवर एकटीच आश्चर्याने तोंडावर दोन्ही हात ठेऊन काहीतरी बघत असल्याचं दिसत आहे. थोड्यावेळाने व्हिडीओमध्ये एक महिला एका मुलाचे केस पकडून त्याला खेचत समोर आणताना दिसत आहे. नंतर ही महिला या मुलाला चपलेने मारहाण करते. गच्चीवर वाळत घातलेल्या कपड्यांच्या आडून या महिलेचा हात हिसकावून हा तरुण पळून जाताना दिसतो.
व्हिडीओ शूट करणार म्हणतो...
हा व्हिडीओ शेजारच्या इमारतीच्या गच्चीवरुन शूट करण्यात आल्याचे दिसते. व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती हा मुलगा पकडला गेल्यानंतर, "पकडलं. तुमच्या समोर तुमच्या मुलीबरोबर चाळे करत होता. तुमच्या मुलीला विचारा काय काय केलं त्याने. विचारा तिला," असं म्हणता ऐकू येत आहे. मुलीचा बॉयफ्रेण्ड पळून गेल्यानंतर ही महिला तिच्या मुलीचा समाचार घेते. ही महिला पायातली चप्पल काढून तिला मारहाण करताना दिसत आहे. "काकूंनी मुलीच्या व्हॅलेंटाइन्स डेच्या प्लॅन उधळून लावला तो क्षण," अशी कॅप्शन व्हिडीओ देण्यात आली आहे.
6 लाखांहून अधिक व्ह्यूज
या व्हिडीओला 6 लाख 27 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील एकाने तरुणपणीचे दिवस आठवले असं म्हटलं आहे तर एकाने या काकूंनी आता लवकर मुलीचं लग्न लावून द्यावं असा सल्ला दिला आहे. काहींनी अशाप्रकारे सज्ञान मुलांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. अशा मुलांशी चर्चा करुन त्यांना या गोष्टींबद्दल समजावलं पाहिजे असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.