कर्नाटकात देवेगौडा किंगमेकरच्या भूमिकेत? काँग्रेस-भाजपला जोरदार टक्कर
कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. पण या निवडणुकीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. पण या निवडणुकीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे.
जनता दल सेक्युलर
कर्नाटकमध्ये प्रदेशानुसार आणि जाती नुसार राजकीय गणिते बदलत चालल्यामुळं कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्यातरी वाटत नाही. त्यामुळं जुना म्हैसूर स्टेटवर मजबूत पकड असणारा जनता दल सेक्युलर हा पक्ष निवडणुकीनंतर किंगमेकरची भूमिका बजावेल असं चित्र कर्नाटकमध्ये दिसून येत आहे.
राजकीय वातावरण तापलंय
कर्नाटकमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. अद्याप निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी ही निवडणूक होत असल्यामुळे याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. राज्यात मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये असली तरी जेडीएस किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे.
माजी पंतप्रधान आणि पक्षाचे नेते एच.डी. देवेगौडा यांचा मोठा प्रभाव जुना म्हैसूर स्टेटमध्ये पहायला मिळतो. त्यांचं जन्मगाव असलेल्या हासनमध्ये जेडीएस नेहमीप्रमाणे मजबूत राहिलाय. मंड्या, तुमकुरु, रामनगर, बेंगळुरू ग्रामीण या भागातही देवेगौडांचा चांगला प्रभाव आहे. देवेगौडांचे पुत्रे आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एच.डी. कुमारस्वामी हे वख्कलीगा समुदायाचं नेतृत्व करतात. या भागात बहुसंख्य असलेला हा समाज उघडपणे देवेगौडांच्या पाठीशी उभा आहे.
देवेगौडा हे आमचे नेते
गेल्या दहा वर्षांपासून विकास नाही. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकास झाला. कुमार स्वामी सगल्या जातीचे प्रतिनिधित्व करतात. म्हैसूर स्टेटमध्ये ७० ते ८० जागा ते जिंकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. देवेगौडा हे आमचे नेते. कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इछा. कुमार स्वामी मुख्यमंत्री आसताना. इंजिनियरींग कॉलेज; मेडिकल कॉलेज काढले. आमच्या मुलांना शिक्षणासाठी बेंगळुरु आणि म्हैसूरला जावे लागेत होत. आता जाव लागत नाही, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे.
निवडणुकीनंतर त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली तर देवेगौडा किंगमेकरची भूमिका बजावलीत याचा अंदाज त्यांच्या मतदारांना निश्चितच आहे. जुना म्हैसूर स्टेटमध्ये आपली खरी लढत काँग्रेससोबत असंल्याचं एच.के. देवेगौडांचे चिरंजीव आणि स्थानिक आमदार रेवण्णा देवेगौडा सांगतायत. या भागात भाजपाचा प्रभाव नसल्याचा त्यांचा दावा आहे.
गेल्या निवडणुकीत जेडीएसला ४० जागा मिळाल्या होत्या. मात्र राज्यसभा निवडणूकीत ७ आमदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केल्यामुळे त्यांची हकालपट्टी झालीये. याचा फायदा उचलण्याची काँग्रेसची खेळी आहे. त्यामुळेच हासन जिल्ह्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दोन सभा घेतल्या. देवेगौडा सत्ता समीकरणात महत्वाची भूमिका बजाऊ शकतात, याचा कॉंग्रेसला अंदाज आहे.
त्यामुळेच जेडीएस म्हणजे भाजपची बी टीम असल्याची हेटाळणी काँग्रेस नेते करतायेत. देवेगौडा यांनी दोन योजना तयार ठेवल्यात. पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या तर कुमारस्वामींना मुख्यमंत्री करायचं आणि किंगमेकर झाल्यास रेवण्णा देवेगौडा यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवायचं, असं देवेगौडांच्या मनात असल्याचं बोललं जातंय.