मुंबई : मावळमध्ये शेतकरी मृत्युला जबाबदार राजकीय पक्षाचे लोक नव्हते, तर तो आरोप पोलीसांवर होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं, तसंच ही परिस्थिती तेव्हा चिघळावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी चिथावणी दिली होती असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिलं आहे. 


मावळचा गोळीबार आदेशावरुनच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या संदर्भात किंवा उत्तर प्रदेशमध्ये जी काही घटना घडली, त्यासंदर्भात शरद पवार जे काही बोलले, त्यांनी असं म्हटलं की मावळमध्ये गोळीबार हा पोलिसांनी केला होता. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो, जालियनवाला बागमध्ये गोळीबार करण्या करता ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल गेले नव्हते, तेव्हाच्या पोलिसांनीच केला होता. पण त्या गव्हर्नर जनरलच्या आदेशावरुन केला होता. त्यामुळे मावळचा गोळीबार हा जेव्हा आम्ही म्हणतो जालियनवाला बागसारखा होता, तेव्हा तिथे राज्यकर्त्यांना जाण्याची आवश्यकता नव्हती, त्यांचे पोलीस त्या ठिकाणी होते असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.


हे नेमकं कोणतं राज्य


उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडते, त्या घटनेकरता इथे तुम्ही बंद करता, आणि बंद केल्यानंतर इथं धुडगुस घालता, हिंसा होते, पहिल्यांदा मी असं बघितलं की पोलीस संरक्षणामध्ये राज्यकर्ते हे लोकांवर दबाव टाकतायत, आणि लोकांना बंद पाडायला भाग पाडतायत, त्यांना मारतायत आणि त्यांचा माल घेऊन पळतायत, आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत हे नेमंक कोणतं राज्य आहे असा सवाल आज आम्हाला विचारण्याची आवश्यकता आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


राज्य सरकार पुरस्कृत बंद


शिवसेना सामिल असल्यावर काय होतं, हे पवार साहेबांनीच सांगितलं, त्यामुळे ही समाधानाची गोष्ट आहे. पण गेले दोन दिवस ज्या बातम्या येत आहेत, त्यामुळे हा बंद किती शांततेत झाला हे सर्वांना माहित आहे. आपण सर्वजण पाहत आहोत पोलीस संरक्षणामध्ये मारामाऱ्या चालल्या आहेत, धमकवणं चाललं आहे, आमदार धमकावत आहेत. म्हणू मला असं वाटतं की हा राज्य सरकार पुरस्कृत भीती निर्माण करुन केलेला बंद होता, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.