मुंबई : दोन वाहनांची एकमेकांना समोरून टक्कर, मोठा अपघात! अशा बातम्या तुम्ही आजवर अनेकदा ऐकल्या असतील. पण, कधी तुम्ही दोन विमानं हवेतच आमने-सामने... अशी बातमी कधी ऐकलीये? आता म्हणाल, वेड लागलंय का? विमानं  एकमेकांसमोर आल्यास विचारही करता येणार नाही, इतका मोठा अपघात घडेल, असंच तुम्ही म्हणाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं वाटणार नाही, पण असं खरंच घडलंय. एविएशन रेगुलेटर डीजीसीएनं या प्रकरणी एका एअर ट्राफिक कंट्रोलरला तीन महिन्यांसाठी कामावरून काढूनही टाकलं होतं. कारण, त्यानं 7 जानेवारीला इंडिगो (IndiGo Airline)च्या दोन विमानांच्या उड्डाणांना एकाच वेळी परवानगी दिली होती. (dgca airlines indigo flight came too close )


विमानं एका क्षणाला एकमेकांसमोर आली, अर्थात दुर्घटना टळली पण प्रवाशांचा जीव कंठाशी आला होता. 


नेमकं काय घडलं होतं? 
इंडिगो (IndiGo Flights) च्या दोन फ्लाइट  6E455 (बेंगलुरु ते कोलकाता) आणि 6E246 (बेंगलुरु ते भुवनेश्वर) 7 जानेवारीला सकाळी बंगळुरू विमानतळावर अनुक्रमे उतरली आणि उत्तर- दक्षिण रनवे वरून त्यांनी उड्डाण घेतलं. 


हवेतच ही विमानं एकमेकांसमोर आली, अर्थात ती एकमेकांवर आदळली नाहीत. डीजीसीए (DGCA)नं या घटनेला 'ब्रीच ऑफ सेपरेशन' म्हटलं. अशी परिस्थिती तेव्हा उदभवते, जेव्हा दोन विमानं हवेतच आल्या कमीत कमी अंतरालाही ओलांडून जवळ येतात. 


ही विमानं एकमेकांच्या दिशेनं पुढे जात असतानाच टक्कर न होऊ देण्यासाठी एप्रोच रडार कंट्रोलरनं डायवर्जिंग ही हेडिंग दिली आणि मोठा अपघात टळला.