मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जात आहे. काही जण या दिवशी आभूषण आणि काही जण लक्ष्मी - श्रीगणेशची मूर्ती खरेदी करणं पसंत करतात. तसेच सोने - चांदीचे नाणे, बिस्कीट खरेदी करतात. या दिवशी विक्री वाढवण्यासाठी ज्वेलर्स वेगवेगळ्या युक्ता करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याची युक्ती सुरतमधील एका ज्वेलर्सने असे सोने - चांदीचे नाणे सादर केले आहेत ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. आणि महत्वाचं हे नाणे अधिक प्रमाणात विकले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो देखील या नाण्यांवर आहे. 


या दुकानदाराच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे ते देखील देवाप्रमाणेच आहेत. यामुळे लोकं सोन्याच्या नाण्यातील मोदी यांचे नाणे खरेदी करून पूजा करणार आहेत. सुरतच्या या दुकानात सोन्या - चांदीचे बिस्कीट आणि बार उपलब्ध आहेत. 10 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत हे सोने उपलब्ध आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकरता मोदी यांच नाणं अतिशय आकर्षक आहेत. दिवाळीच्या दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून 6 वर्षातील सर्वात उच्चांक गाठला आहे. आता सोन्याचा दर हा 32,780 रुपये आहे.