Diwali 2022 : दिव्यांचा सण म्हणला जाणारा दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण... नवनवीन कपडे, फटाके लाडू, चिवडा, करंज्या, चकली अशा गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वत्र साजरी होईल. धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi 2022) सण लक्ष्मीपुजनाच्या 2 दिवस आधी साजरा (laxmi pujan) केला जातो. यंदा 22 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. 


Dhantrayodashi 2022 -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनत्रयोदशी अनेक प्रकारे लोकांसाठी शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी बरेच लोक खरेदी करतात, म्हणून हा 'खरेदीचा सण' देखील मानला जातो. धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केली (laxmi puja) जाते. तसेच भगवान धन्वंतरीची पूजा (diwali puja 2022)  केली जाते. परंतू धनत्रयोदशीला प्रत्येक जण काहीना काही खरेदी करतात.


यंदा (Dhantrayodashi diwali 2022 date) धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीची पूजा 22 ऑक्टोबरच्या संध्याकाळीच करावी पण खरेदी मात्र दोन्ही दिवशी करता येईल. शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे रविवारी खरेदी करावी, असं सांगण्यात येत आहे.


तिथीनुसार, यावर्षी (Dhantrayodashi muhurat) कार्तिक कृष्ण त्रयोदशी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 06:03 वाजता सुरू होत आहे, तर 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06:04 पर्यंत कार्तिक कृष्ण त्रयोदशी राहील. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.19 ते 05.44 पर्यंत राहुकाल असल्याने या काळात खरेदी करून नका, असं सांगण्यात येत आहे.


आणखी वाचा - Diwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही


दरम्यान, धनत्रयोदशीला खरेदी केलेला नवीन झाडू घरी आणणं हे समृद्धीचं लक्षण आहे असं मानलं जातं. शेअर बाजारात देखील या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं पहायला मिळतं. घरात सुख समृद्धी आणि पैसे यावेत यासाठी अनेकजण चंदन लावून लक्ष्मी मातेची पुजा करतात.


Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.