Election results 2019: विजयाची `बॉर्डर` ओलांडणाऱ्या सनी देओल यांची कुटुंबाकडून प्रशंसा
धर्मेंद्र यांनी ट्विटरवरुन पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांना शुभेच्छा दिल्या आहेत
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देओल कुटुंबातील उमेदवार आघाडीवर आहेत. मथुरामधून हेमा मालिनी आणि गुरदासपूर येथील लोकसभा मतदारसंघातून सनी देओल आघाडीवर आहेत. अद्याप निकालाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या दोघांचाही विजय निश्चित मानण्यात येत आहे. सोशल मीडियावर हेमा मालिनी आणि सनी देओल यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बॉलिवुड अभिनेते धर्मेंद्र यांनी ट्विटरवरुन पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो पोस्ट करत, 'अभिनंदन हेमा. आपलं भारतमातेवर प्रेम आहे. आपण बिकानेर आणि मथुरामधून हे दाखवून दिलं आहे. आपण नेहमीच आपल्या भारताला मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ' असे ट्विट केलं आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये धर्मेंद्र यांनी सनी देओल यांचे अभिनंदन करत 'फकीर बादशाह मोदीजी, पंजाबचा पुत्र सनी देओल, अभिनंदन, अच्छे दिन आले आहेत.' असं ट्विट केलं आहे.
अभिनेत्री ईशा देओलनेही आई हेमा मालिनी आणि भाऊ सनी देओल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. 'अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीएमओ, भाजपा, हेमा मालिनी आणि सनी देओल. तुमच्या विजयाचा अभिमान आहे' अशा शब्दांत ट्विट करत त्यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत ईशा देओलने अभिनंदन केलं आहे.
सनी देओल यांच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं. धर्मेंद्र आणि बॉबी देओल अनेक दिवसांपर्यंत सनी देओल यांच्यासोबत गुरदासपुरमध्ये प्रचारासाठी हजर होते. सनी देओल यांनी 'मला अतिशय आनंद होत आहे की मोदी यांचा विजय होत आहे.' असं म्हटलं आहे.
माझ्या विजय होत आहे. आता माझा केवळ एकच उद्देश आहे की, मला जो विजय मिळाला आहे त्याबदल्यात मी काम करु इच्छितो. माझ्या मतदारसंघाचा विकास करणं ही माझी जबाबदारी आहे. लोकांनी जे प्रेम दिलं आहे त्याचा मला आनंद आहे. मी इथे कोणत्याही हेतूने आलो नव्हतो. मला केवळ माझं काम करायचं आहे.' असं सनी देओल यांनी म्हटलं आहे.