Dhulivandan 2023 : होळी अर्थात होलिका दहन (Holi 2023) फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. देशभरात होळी अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळी साजरी करण्याची प्रत्येक राज्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी त्यामागील उद्देश हा एकच आहे. होळा (holi 2023) हा सण अनेक नावांनी ओळखला जातो. जसे की, महाराष्ट्रामध्ये याला शिमगा (Konkan Shimga Utsav), हुताशनी दक्षिणेत कामदहन, बंगालमध्ये दौलयात्रा, तर उत्तरेत याला दोलायात्रा असं म्हटले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होळी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पण आजकाल होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळायला सुरुवात झाली आहे. मात्र तुम्हाला माहितीय का? होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच धुलिवंदन (Dhulivandan) का साजरी केली जाते...


धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते (Dhuliwandan Date)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी (holi 2023) पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला लावून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. म्हणून धुलिवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. तर सुरूवातीच्या काळात असं म्हटलं जातं होत की, होळीची लाकडे जळल्यावर जी राख राहते ती पाण्यात मिसळून त्याने स्नान करणे हा खरा हेतू होता. हल्ली त्याच दिवशी रंगपंचंमीप्रमाणे रंगोत्सव साजरा करतात. लोक एकत्र जमून हास्य विनोदात दिवस घालवतात. काही ठिकाणी भांग पिण्याची पद्धत आहे. 


वाचा: 'आमचे दाराशी हाय शिमगा...', होळीसाठी धावणार स्पेशल ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक  


धुलिवंदन म्हणजे काय?


धुलिवंदन म्हणजे वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. होळी पेटवल्यानंतर त्याचा धूर केल्याने वातावरण शुद्ध होते अशी भावना आहे. होळीत अन्न पदार्थाचा समावेश करतात. यामध्ये विशेषत:  पुरणपोळीसारख्या पक्वानांती आहुती दिली जाते.   


रंगपंचमी साजरा करण्यामागेचे कारण (Rangpanchami in Marathi)


तसेच अनेक भागात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा दाह कमी व्हावा म्हणून हा सण साजरा करण्याची ही पद्धत आहे. तर दुसरीकडे धुळवड साजरा करण्यामागेही एक पुराणात कथा सांगितल्या आहेत की, द्वापारयुगात गोकुळात आपल्या  गोपाळ संवंगड्यांवर पिचकारीने रंग उडवत व उन्हाची लाही कमी करत असत. तीच प्रथा आजही सुरु आहे. पूर्वी रंगाची उधळण केली तरी ते रंग नैसर्गिक असत. पण आता हे रंग केमिकलयुक्त असतात. आताचे याचे स्वरुपही वेगळे आहे.