मुंबई : १० रुपयांचे नाणे वैध की अवैध यावरुन अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकजण ही नाणी स्‍वीकारणे टाळत आहेत. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही प्रसिद्ध केला आहे.


या क्रमांकावर करा फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४४४० या क्रमांकावर फोन करताच तुमच्याकडील १० रुपयांचं नाणं वैध आहेत हे तुम्हाला कळणार आहे.


तुम्हाला तात्काळ येईल फोन


१४४४० या टोल फ्री क्रमांकावर फोन करताच तुमचा फोन कट होईल. त्यानंतर तुम्हाला तात्काळ फोन येईल आणि आयव्हीआरच्या माध्यमातून १० रुपयांच्या नाणांसंदर्भात सर्व माहिती दिली जाईल. 


रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १० रुपयांच्या नाण्याचे १४वेगवेगळे डिजाइन उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता नाणी स्‍वीकारावीत.


RBI ने केला हा खुलासा 


१० रुपयांच्या नाण्यांसंदर्भात असलेला गोंधळ दूर करण्यासाठी आरबीआयने खुलासा केला आहे. आरबीआयने सांगितले की, १० रुपयांचे जितकी नाणी उपलब्ध आहेत ती सर्व वैध आहेत.



यापूर्वीही आरबीआयने केलं होतं स्पष्ट


आरबीआयने नोव्हेंबर महिन्यातच १० रुपयांची सर्व नाणी वैध असल्याचं म्हटलं होतं. मात्र, तरीही नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.


न घाबरता करा व्यवहार


आरबीआयने नागरिकांना विश्वास दिला आहे की, कोणतीही भीती न बाळगता १० रुपयांच्या नाण्यांनी व्यवहार करा. ही नाणी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनीही स्विकारावी.