Diamond Necklace Recovered From Garbage: कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढीगात एक चमकणारी वस्तु दिसली. जवळ जावून पाहताच त्यांचे डोळेच विस्फारले. कचऱ्यात त्यांना तब्बल लाखो रुपयांचा हार सापडला. चेन्नईतील नगर निगम कॉर्पोरेशनच्या टीमला कचऱ्यात हिऱ्याचा हार सापडला होता. अस्सल हिरे असलेला हा कार कचऱ्यात कसा काय आला, हे मात्र त्यांच्यासमोर मोठं कोडं होतं. हिऱ्याचा हार सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जे पाऊल उचललं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कचऱ्यात सापडलेल्या हाराची किंमत तब्बल 5 लाख रुपये इतकी होती. कर्मचाऱ्यांना हार सापडल्यानंतर त्यांनी तो मुळ मालकाला परत केला. चेन्नईतील विरुगमबक्कम येथे राहणाऱ्या देवराज नावाच्या व्यक्तीचा हा हार होता. त्यांच्याकडून हा हार चुकीने हरवला होता. देवराज यांच्या आईने हा हार त्यांच्या मुलीला लग्नाचे गिफ्ट म्हणून दिला होता. काहीच दिवसांत तिचे लग्न होणार होते. 


हार हरवल्यानंतर देवराज यांनी लगेचच शहरातील महानगरपालिकेकडे मदत मागितली. त्यानंतर त्यांच्या घराजवळच्या कचराकुंडीत लगेचच हिराच्या हारांचा शोध सुरू झाला. हिऱ्याचा हार शोधण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली करण्यात आले. कर्मचाऱ्यांनीही इमानदारीने हार शोधण्यात मदत केली. अखेर घराजवळील सर्व कचरा कुंडी तपासण्याच्या कामाला वेग आला.


कचऱ्यांच्या कुंडी तपासत असतानाच एका मोठ्या फुलांच्या माळेमध्ये गुरफटलेला होता. त्यानंतर सावधानीपूर्वक हा हार कचराकुंडीतून काढण्यात आला. लाखो रुपये किमतीचा हार कचऱ्यातून काढण्यात आल्यावर देवराज यांनी पालिकेच्या पथकाचे आभार मानले आहेत. तसंच, त्या कर्मचाऱ्याचेदेखील आभार मानले आहेत. 


ज्या कर्मचाऱ्यांनी हा हिऱ्याचा हार शोधून काढला आहे. ते खरं तर ई रिक्क्षा चालक आहेत. त्यांचे नाव एंथोनीसामी असं असून त्यांनीच हा हार शोधून काढला. ऑक्टोबर 2020 मध्ये नगर निगमकडून कचरा प्रबंधनासाठी ज्या कंपनीला कंत्राट मिळाले होते. त्यातीलच ते कर्मचारी आहेत.