मुंबई : तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याच्या विचारात असाल तर ही नियमावली तूम्ही एकदा पाहाचं. नेमकी ही नियमावली काय आहे ती जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. तुम्हाला आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करावी लागेल. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल अर्जदारांनाही  ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. या नव्या बदलामुळे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या प्रतिक्षा यादीत पडलेल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलसाठी नियम 


1) टु व्हिलर, थ्री व्हिलर आणि फोर व्हिलर वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे आवश्यक आहे. तर मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तूंच्या वाहनांसाठी किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.


2. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगली माहिती असावी. 


3. मंत्रालयाने अभ्यासक्रम देखील आणला आहे. ज्यात हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागला जाईल. 


4) ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतील. संपूर्ण अभ्यासक्रम 8 तासांचा असेल, त्यात रस्त्यांची नियमावली, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.