केव्हा सुरु झाली `भारतरत्न` पुरस्काराची परंपरा? या सोप्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर जाणून घ्या
`भारतरत्न` हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करण्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारत रत्न पुरस्कर दिला जातो. हा पुरस्कर प्रजासत्ताकदिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पात्र व्यक्तीला प्रदान केला जातो. प्रशासनातर्फे सन्मानित व्यक्तीला हा पुरस्कार मेडल आणि प्रमाणपत्र या स्वरूपात दिला जातो. या शिवाय सन्मानीत व्यक्तीला अनेक सोयीसुविधा दिल्या जातात.
Bhart Ratna Award: 'भारतरत्न' हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करण्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारत रत्न पुरस्कर दिला जातो. हा पुरस्कर प्रजासत्ताकदिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पात्र व्यक्तीला प्रदान केला जातो. प्रशासनातर्फे सन्मानित व्यक्तीला हा पुरस्कार मेडल आणि प्रमाणपत्र या स्वरूपात दिला जातो. या शिवाय सन्मानीत व्यक्तीला अनेक सोयीसुविधा दिल्या जातात.
हा सर्वोच्च पुरस्कर प्रदान करण्याची सुरुवात 2 जनेवारी 1954 रोजी झाली होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारत रत्न पुरस्करावर मान्यतेची मोहर उमटवली. पहिल्यांदा भारत रत्न पुरस्कर माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan), वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन (Dr. Chandrasekhara Venkata Raman) आणि भारताचे पहिले गवर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी (C. Rajagopalachari) यांना प्रदान करण्यात आला होता.
'भारतरत्न' पुरस्काराची परंपरा का सुरु झाली?
स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर देशातील जनतेमध्ये एक नवी आशा जागृत झाली. भारत देश रत्नांची खाण आहे. देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या रत्नांचा सन्मान करण्यासाठी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असावा. अशा सन्मानाची गरज भासू लागली. देशाकरता मोठं योगदान देणाऱ्या व्यक्ती इतरांसाठी आदर्श ठरू शकतात या अर्थाने 'भारत रत्न' या पदकाची सुरुवात झाली.
आजपर्यंत कोणकोण या सर्वोच्च पदकाचे मानकरी
आजपर्यंत या सर्वोच्च नागरिक सन्मानाने 53 जणांना सन्मानित केले गेले आहे. महाराष्ट्रीयांसाठी गर्वाची बाब म्हणजे सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत. एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना प्रतिष्ठित 'भारतरत्न' पुरस्कार मिळू शकतो. पण 2024 मध्ये, हा सन्मान पाच प्रतिष्ठित व्यक्तींना प्रदान करण्यात आला. यांची नावे कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पीव्ही नरसिंह राव, चरण सिंग आणि एम.एस. अशी आहेत.
सर्वोच्च पदकाविषयी 'हे' माहित असायलाचं हव
भारतरत्न पुरस्काराची परंपरा 1954 मध्ये सुरू झाली आणि सुरुवातीला फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जात असे. पुढे 1955 मध्ये नियम बदलले आणि हा सन्मान मरणोत्तरही दिला जाऊ लागला. भारत रत्न हा भारतीय पुरस्कार असून हा नेल्सन मंडेला आणि अब्दुल गफ्फार खां या दोन विदेशी व्यक्तिमत्त्वांना सुद्धा प्रदान करण्यात आला होता. ज्या व्यक्तींनी समाज सेवा, कला, विज्ञान, साहित्य, खेळ या क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी केली असेल अशा थोर व्यक्तींना 'भारत रत्न' पुरस्कर बहाल केला जातो.
कला: संगीत, चित्रकला, नृत्य इत्यादी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांना 'भारत रत्न' पुरस्कार दिला जातो.
साहित्य: साहित्य क्षेत्रात अद्वितीय कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना 'भारत रत्न' पदक दिलं जातं.
विज्ञान: विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे शोधकार्य करणाऱ्या महान संशोधकांना या सन्मानाने सन्मानित केले जाते.
समाजसेवा: देशाच्या समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या समाजसेवकांना हा सन्मान प्रदान केला जातो.
खेळ: या क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील हा सन्मान दिला जातो.