नवी दिल्ली : घरातून निघतांना तुम्ही ड्रायविंग लायसन्स घरी विसरता किंवा आरसी बूक देखील घरीच विसरुन जाता तेव्हा ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करतात. पण आता तुम्हाला घाबरण्य़ाची गरज नाही.


लायसन्स घरी विसरलात तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सरकारने ड्रायविंग लायसेन्सची हार्ड कॉपी ठेवण्याची सक्ती शिथील केली आहे. पण जर तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल तर काय अनिवार्य आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


आता दंड नाही


ड्रायविंग करतांना जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसेन्सची हार्ड कॉपी नसेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपी दाखवून देखील दंड टाळू शकता. पण यासाठी अट अशी आहे की, त्यासाठी तुमच्याकडे लायसन्सची सॉफ्ट कॉपी तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये असली पाहिजे. येथून ट्रॅफिक पोलीस तुमचं ड्रायविंग लायसेंस वेरिफाय करेल. डिजिटल लॉकर हा पीएम मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा भाग आहे.


काय आहे डिजिटल लॉकर


सरकारने डिजिटल लॉकरला एका खास उद्देशाने लॉन्च केलं आहे. याचा उद्देश भौतिक कागदपत्रांचा वापर कमी करण्यासाठी आहे. ई-कागदपत्रांचा वापर वाढवण्यासाठी भर देण्यात येणार आहे. डिजिटल लॉकरमध्ये अकाउंट बनवून त्यामध्ये तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत यासारखे महत्त्वाचे कागदपत्र ठेवू शकता. डिजिटल लॉकरमध्ये ई-साइनची सुविधा देखील आहे. ज्याचा उपयोग डिजिटल रूपात हस्ताक्षर करण्यासाठी देखील होऊ शकतो.


असं बनवा डिजिटल लॉकर


डिजिटल लॉकरसाठी तुम्हाला https://digitallocker.gov.in वर तुमचं अकाउंट बनवावं लागेल. यासाठी तुम्हाला आधार नंबरची आवश्यकता आहे. साईटवर साईनअप केल्यानंतर तुमचा आधारकार्ड नंबर द्यावा लागेल. दोन ऑप्शन यासाठी यूजरच्या वेरिफिकेशनसाठी असतील. पहिला ऑप्शन म्हणजे ओटीपी, वन टाइम पासवर्ड ज्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पासवर्ड येईल. जर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडता म्हणजे अंगठ्याची खून निवडता तर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागेल. वेरिफाय झाल्यानंतर तुम्ही तुमचं युजरनेम आणि पासवर्ड ठेवू शकता.


सरकारी विभागांसोबत शेअर करा


तुम्ही डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याच्या समोर शेअर असा विकल्प असतो. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही ज्या व्यक्ती किंवा संस्थेसोबत ते कागदपत्र शेअर करु इच्छिता. त्यांचा ईमेल आयडी टाकून शेअर करु शकतो.


या फॉरमॅटमध्ये होणार फाईल सेव


डिजिटल लॉकरमध्ये तुम्ही तुमच्या फाइल्स pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif फॉरमॅटमध्ये सेव करु शकता. अपलोड केली जाणारी फाईलची साईज 1 एमबीपेक्षा मोठी नसेल. सध्या प्रत्येक यूजरला १० एमबीपेक्षा जास्त स्पेस नाही मिळत आहे. पण ती १ जीबी पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.


डिजिटल लॉकर का ?


या प्रकारच्या सुविधेसाठी डिजिटल लॉकरमध्ये सेव केले गेलेल डॉक्यूमेंट्सला मान्यता दिली गेली आहे. याचं कारण असं आहे की, यामध्ये फसवणुकीची कोणतीही शक्यता नाही आहे. कारण येथे अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला आधी आधार नंबर द्यावा लागतो. यासाठी एकदम सोपी ऑनलाइन प्रक्रिया आहे.